¡Sorpréndeme!

Auranagabad | राज्यातील पहिले ब्ल्यू ऍस्ट्रोटर्फ मैदान औरंगाबादमध्ये

2021-04-28 241 Dailymotion

औरंगाबाद | राष्ट्रीय खेळ हॉकीला चालना देण्यासाठी भारतीय खेळ प्राधिकरण (साई)च्या औरंगाबाद प्रशिक्षण केंद्रात 4.8 कोटी रुपये खर्चून राज्यातील पहिले ब्ल्यू ऍस्ट्रोटर्फ मैदान बनवण्यात आले आहे. हे 91.4 लांब, तर 55 मिटर रुंद मैदान तयार करण्यासाठी दीड वर्षांचा अवधी लागला. लंडन आणि रियो ऑलिम्पक स्पर्धेसाठी हॉकी मैदाने उभारणाऱ्या कारागिरांनीच हे सुसज्ज मैदान बनवले आहे, हे विषेश. ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारे या मैदानाचे विहंगम दृष्य.
(व्हिडीओ : मोहम्मद इम्रान, राहुल पवार)